नरेंद्र मोदी बिनकामाचे- राहुल गांधी

Foto

नवी दिल्‍ली- राफेल विमान खरेदी करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीकेची तोफ डागणारे काँग्रेसचे अध्यक्ष खा.राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिनकामाचे व्यक्‍ती असून, कुणाचेही ऐकत नाहीत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 

 

मोदींच्या राज्यात शेतकर्‍यांचे हाल सुरू आहेत, तर दुसर्‍या बाजूला काँग्रेसने त्यांच्या शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली, ही गोष्ट भाजपला रुचलेली नसून मोदींचा जळफळाट होत आहे. भारताच्या विकासाची कथा काँग्रेसने लिहिली आहे. परंतु मोदींनी नोटाबंदी आणि गब्बर सिंह टॅक्स (जीएसटी) चा वापर करून त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नोटबंदी आणि जीएसटी हे मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश म्हणून समोर येईल,असे गांधी यांनी म्हटले आहे.